डॉ. सुधीर शेतकर: अपोलो हॉस्पिटलमध्ये आता नाशिककरांना पर्याय
अँजिओग्राफी चाचणीत हृदयरोग निदान झाले तरीही, हृदयाला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत असल्यास अँजिओप्लास्टी किंवा बायपास करण्याची गरज नसते. मात्र, रक्तपुरवठ्याचे 10 प्रमाण मोजणारे तंत्रज्ञान अर्थात एफएफआर (फंक्शनल फ्लो रिझर्व्ह) उपलब्ध असतानाही त्याबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे अनेकदा गरज नसतानाही अँजिओप्लास्टी केली जाते. अपोलो हॉस्पिटलने गेल्या काही दिवसांत अशा ५० रुग्णांना एफएफआर तंत्राने दिलासा दिल्याची माहि हृदयरोग तज्ज्ञ ( Cardiologist in Nashik )डॉ. सुधीर शेतकर यांनी दिली.
पंचवटीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या तंत्राबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, एखाद्या रुग्णाची अँजिओग्राफी केल्यानंतर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज दिसल्यास त्याला कोरोनरी आर्टरी डिसिज म्हणतात.
आतापर्यंत रक्तवाहिनीतील असे ब्लॉकेज पाहण्यासाठी अँजिओग्राफी ही एकमेव तपासणी होती. त्यानंतरच अँजिओप्लास्टी की बायपास शस्त्रक्रिया हे ठरवले जाते. अनेकदा अँजिओग्राफीत जे ब्लॉकेज दिसतात ते अत्यंत कमी प्रमाणात रक्तपुरवठ्याला बाधा आणतात. अशा रुग्णांना योग्य औषधोपचाराने हृदयशस्त्रक्रियेविना आरोग्यदायी आयुष्य जगता येते. मात्र, रक्तपुरवठा किती प्रमाणात होतो आहे, हे एफएफआरद्वारे समजू शकते. या चाचणीचे मापदंड हे जगभरात सारखेच असल्याने त्याचा थेट अचूक निदानात होतो. हृदयाला केवळ ८० टक्क्यांखाली रक्तपुरवठा होत असेल तर अशावेळी अँजिओप्लास्टिचा निर्णय घ्यावा लागतो. मात्र, एफएफआर तंत्रज्ञान रुग्णांसाठी वरदान असल्याचे डॉ. शेतकर म्हणाले. यावेळी अपोलो हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वैद्यकीय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अभयसिंग वालिया उपस्थित होते.
असे आहे एफएफआर तंत्र
हृदयाच्या रक्तवाहिनीमधील (इंट्रा कोरोनरी) प्रेशर (दाब) आणि प्रवाह मोजून ही प्रणाली अचूक माहिती पुरवते. त्यासाठी सदोष रक्तवाहिनीत सेन्सर असलेली एक तार पाठवली जाते. रक्ताच्या गुठळीआधीचा आणि त्यापुढील अशा दोन ठिकाणचा दाब या सेन्सरद्वारे मोजला जातो. त्यावरुन रक्तपुरवठ्याला नेमका किती टक्के बाधा पोहोचते आणि हे समजते आणि त्यावरुन तज्ज्ञ शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेऊ शकतात. म्हणजे ब्लॉकच्या आधीचा रक्तपुरवठा हा १०० टक्के आणि पुढील ९० टक्के असेल. याचा अर्थ ब्लॉकमुळे केवळ १० टक्के रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. ज्यावर औषधोपचार किंवा अन्य उपचार होऊ शकतील.