शेतकर: शिक्षणशास्त्र महाविद्यालयात चर्चासत्र.
माणसाची सुयोग्य जीवनपद्धती, आहारपद्धती, आशावादी दृष्टिकोन, नियमित व्यायाम, मनाची शांतता, स्वास्थ्यपूर्ण जगण्याची कला, शांत झोप या सर्व बाबी उच्च जीवनमानासाठी महत्त्वपूर्ण आहेत, असे प्रतिपादन अपोलो हॉस्पिटलचे कार्डियोलॉजिस्ट (Cardiologist in Nashik) डॉ. सुधीर शेतकर यांनी केले.
अॅड. हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित दोनदिवसीय चर्चासत्राच्या दुपारच्या सत्रात केले. शेतकर म्हणाले की, मानवी जीवन धकाधकीचे बनत चालले आहे. या धावपळीच्या युगात मानवाने स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. जीवनात विज्ञानवाद आणून वार्षिक शारीरिक तपासणी होणे गरजेचे आहे. आजार बळावल्यानंतर उपचार करण्यापेक्षा वेळीच प्रतिबंध केले, तर मानवी जीवन सुखी होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
प्राचार्य चंद्रकांत बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी डॉ. मंगेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार प्रदर्शन प्रा. अनिता शेळके यांनी केले.