येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये अनावश्यक अँजिओप्लॉस्टीला पर्याय ठरणारे एफएफआर तंत्रज्ञान रुग्णसेवेत दाखल झाले.
या तंत्रज्ञानाने रक्तवाहिनेचे ब्लॉकेज प्रमाण सुनिश्चित करून अनावश्यक अँजिओप्लास्टी टाळणे शक्य झालेले आहे. हृदयाच्या रक्तवाहिनीमधील ब्लॉकेज आहे की नाही, हे ठरविण्यासाठी अँजिओग्राफी ही एकमेव तपासणी करण्यात येते. जर ब्लॉकेज असल्यास त्यावर अँजिओप्लास्टी करून निदान केले जाते. परंतु रुग्णांच्या रक्तवाहिनीचे ब्लॉकेजचे प्रमाण किती प्रमाणात आहे, हे ठरविण्यासाठी अद्याप कोणतेचे सुनिश्चित तंत्रज्ञान नसल्यामुळे रुग्णावर गरज नसताना अँजिओप्लास्टी करण्यात येत, असे हे टाळण्यासाठी एफएफआर तंत्रज्ञानाच्या आधारे आता रक्तवाहिनेचे ब्लॉकेज प्रमाण पाहून अनावश्यक अँजिओप्लास्टी टाळणे. शक्य आहे.
अपोलो हॉस्पिटलमधील हृदयशल्यचिकित्सक (Cardiologist in Nashik)डॉ. सुधीर शेतकर यांनी उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त म्हणजे ५० रुग्णांवर एफएफआर अत्याधुनिक तपासणीचा वापर केला. त्यामध्ये २० रुग्णांवर अनावश्यक अँजिओप्लास्टी करण्याची गरज नसल्याचा सल्ला देत त्यांची ही प्रक्रिया टाळण्यात आली. हार्ट ब्लॉकेज असणांच्या रुग्णांसाठी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आशेचा नवीन किरण असल्याची माहिती डॉ. शेतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अपोलो हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरी मेनन, हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अभयसिंग वालिया याप्रसंगी उपस्थित होते.
काय आहे एफएफआर तंत्रज्ञान ?
‘एफएफआर’ म्हणजे फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह हा नवीन अत्याधुनिक आविष्कार आहे. ज्यांद्वारे हृदयाचा रक्तवाहिन्यांमधील गुठळी (क्लॉट) | पूर्वीचा आणि गुठळी नंतरचा रक्तदाब मोजून ही प्रणाली माहिती देते. याद्वारे हृदयाला ब्लॉकेजमुळे हृदयाला खरेच रक्तपुरवठा कमी होत आहे की नाही, हे सुनिश्चित केले जाते.